23/01/2026
*🐥 रोशनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स 🐥*
*🏞️✨ महाबळेश्वर – पाचगणी – भिलार – प्रतापगड*
निसर्ग, इतिहास आणि आठवणींचा अविस्मरणीय प्रवास ✨🏞️
📅 दिनांक : १८, १९ व २० जानेवारी २०२६
⏰ कालावधी : १ रात्र / २ दिवस
काही प्रवास हे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात,
तर ते माणसाच्या मनात खोलवर रुजतात…
हसणं, शिकणं, थकणं, अनुभवणं आणि आयुष्यभरासाठी आठवणी गोळा करणं —
असाच हा महाबळेश्वर – पाचगणी – भिलार – प्रतापगड चा प्रवास होता. 🌿
*सर्वांचे मनापासून आभार..*
आपण सर्वांनी ऐतिहासिक प्रतापगड , थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथील सर्व पॉइंट,पंचगंगा व शिव मंदिर, शॉपिंग, मॅप्रो कंपनी, स्ट्रॉबेरी शेती, भिलार पुस्तकाचं गाव, पाचगणी येथील टेबल लॅंड , पाच पांडवांची चूल व ठसे , सिल्वर ओक ची निसर्गरम्य झाडं, चैन्नई एक्स्प्रेस, तारे जमीन पर, , राजा हिंदुस्तानी, बाजीराव मस्तानी या प्रसिद्ध चित्रपट शुटिंग ठिकाण , राजेश खन्ना ची मुलं व सिने अभिनेत्री काजल शिकलेली शाळा व बोर्डिंग, सह्याद्रीच्या रांगा ,गुहा , घोडे सवारी.. तदनंतर वाई येथील पौराणिक गणपती मंदिर व पार्वती माता मंदिर.... यासह अनेक गोष्टी पाहिल्या... अनुभवल्या.. रुममध्ये व गाडीमध्ये फुल्ल एंजॉय करत धमाल व मस्ती केली. विनातक्रार व विना अडथळा आपण सुखरूप प्रवास करत मंद्रुप येथे पहाटे आलो...
सहल खूपच छान झाली. साळवे सर, कट्टिमनी मॅडम व निंबर्गी सर यांचे आयोजन, नियोजन व संयोजनात अनमोल सहकार्य लाभले.
प्रवास वर्णन
*🚌 १८/०१/२६* – उत्साहात प्रवासाची सुरुवात
सोलापूर येथून रात्री ठिक 10:30 वाजता आमच्या सहलीची सुरुवात झाली.
संतोष भीमराव पाटील महाविद्यालय, मंद्रूप येथे बसची विधीपूर्वक पूजा करण्यात आली.
प्रवास सुरू होण्याआधीच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद आणि नवीन अनुभवांची ओढ स्पष्ट दिसत होती. बसमध्ये बसताच गाणी, डान्स, अंताक्षरी, खेळ, विनोद, टाळ्यांचा गजर सुरू झाला. दिवसभराचा थकवा विसरून विद्यार्थी मस्तीमध्ये रमले.
रात्रीच्या शांत वातावरणात सहल सुरू असताना खिडकीतून दिसणारे रस्ते, झाडं, थंड हवा आणि मैत्रीची साथ —
हा सगळा प्रवासच एक वेगळा अनुभव बनून गेला. थोड्या वेळाने हसत-खेळत सगळे गाढ झोपेत गेले. 🌙🚌
*🌄 १९/०१/२६ –* महाबळेश्वर : निसर्गाच्या सान्निध्यात सकाळी साधारण 7 वाजता थंड, स्वच्छ आणि आल्हाददायक हवेत महाबळेश्वरला पोहोचलो.
धुक्याने वेढलेली झाडं, हिरवळ आणि शांतता मनाला प्रसन्न करणारी होती. हॉटेलमध्ये फ्रेश-अप करून गरम नाश्ता घेतला आणि दिवसाच्या पहिल्या प्रवासासाठी सज्ज झालो.
*🏰 प्रतापगड किल्ला –* इतिहासाशी थेट भेट
नाश्त्यानंतर ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याकडे प्रस्थान केलं.
किल्ल्याच्या उंच-उंच दगडी पायऱ्या चढताना थकवा जाणवत होता,
पण प्रत्येक पायरीसोबत इतिहास जवळ येत होता. वर पोहोचल्यानंतर नजरेस पडलेला अफाट निसर्ग, खोल दऱ्या, दगडी तटबंदी आणि इतिहासाची साक्ष देणारी रचना पाहून सगळे भारावून गेले.
⚔️ छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांच्या ऐतिहासिक भेटीचं स्थळ पाहताना क्षणभर आपण इतिहासात गेलो आहोत असंच वाटत होतं.
🙏 भवानी माता मंदिर येथे दर्शन घेऊन सर्वांनी मनोभावे प्रार्थना केली. मंदिर परिसरात सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. याठिकाणी ग्रुप फोटो, आठवणींचे फोटो आणि हास्याचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. किल्ल्याची सैर पूर्ण झाल्यावर सगळ्यांना चांगलीच भूक लागली होती मग काय गरमागरम आणि चविष्ट जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होतीच. जेवणानंतर थोडा वेळ आराम करून पुढील प्रवासासाठी ऊर्जा मिळाली.
*🌇 सवित्री पॉईंट* व सनसेट पॉईंट – निसर्गाचा सोनेरी क्षण
सायंकाळी सवित्री पॉईंट व सनसेट पॉईंट येथे पोहोचलो.
*🌊 पंचगंगा मंदिर* व 🕉️ *शिव मंदिर* पंचगंगा मंदिर आणि शिव मंदिर येथे दर्शन घेतलं. आध्यात्मिक वातावरणामुळे मनाला वेगळीच शांती मिळाली. दिवसभराच्या धावपळीला येथे विराम मिळाला. रात्री 8 वाजता हॉटेलमध्ये परतलो. रात्रीचे जेवण करून 🍓 स्ट्रॉबेरी, 🍬 चिक्की आणि स्थानिक वस्तू खरेदीसाठी बाजारात फेरफटका मारला. दिवसभराच्या थकव्यामुळे रात्री गाढ झोप लागली. 🌙
*🌅 २०/०१/२६* – शिक्षण, निसर्ग आणि श्रद्धेचा संगम सकाळी नाश्ता करून 🍓 Mapro Garden कडे प्रस्थान केलं. सुंदर गार्डन, रंगीबेरंगी फुले, शरबत टेस्ट, स्ट्रॉबेरी शेतात फोटोसेशन यामुळे सर्वजण आनंदी झाले. त्या नंतर
*📚 भिलार – पुस्तकांचं गाव* पुढचा थांबा होता भिलार. येथे लायब्ररी मॅडमकडून गावाची संकल्पना, इतिहास आणि वाचनसंस्कृतीचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं. मोबाईलच्या युगात पुस्तकांचं महत्त्व पुन्हा जाणवलं. “दर आठवड्याला किमान एक पुस्तक वाचायचंच” असा निर्धार करून आम्ही भिलारला निरोप दिला. 📖✨
*🌄 पाचगणी* –पाचगणी येथील टेबल लॅंड , पाच पांडवांची चूल व ठसे , सिल्वर ओक ची निसर्गरम्य झाडं, चैन्नई एक्स्प्रेस, तारे जमीन पर, , राजा हिंदुस्तानी, बाजीराव मस्तानी या प्रसिद्ध चित्रपट शुटिंग ठिकाण , राजेश खन्ना ची मुलं व सिने अभिनेत्री काजल शिकलेली शाळा व बोर्डिंग, सह्याद्रीच्या रांगा ,गुहा , घोडे सवारी.. हे सगळं पाहताना वेळ कसा गेला कळलंच नाही. 🛕 स्वामी समर्थ मंदिर व शिव मंदिर येथे दर्शन घेऊन घोडागाडीचा आनंद, मॅगी, भजी आणि पाणीपुरीचा स्वाद घेतला. हसणं, गप्पा, फोटो आणि मस्ती — पाचगणीने सगळ्यांच्या मनात जागा केली. 😋
🙏 वाई – श्रद्धेचा शेवटचा टप्पा
प्रवासाचा शेवटचा थांबा होता वाई. वाई गणपती मंदिरात दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली. यानंतर रात्रीच जेवण करून सोलापूरकडे परतीचा प्रवास सुरू झाला.
🌅 पहाटे साधारण 5 वाजता सर्वजण सुखरूप सोलापूरला पोहोचलो.
✨ निसर्गसौंदर्य, इतिहास, अध्यात्म, शिक्षण, मैत्री, हास्य आणि आयुष्यभराच्या आठवणींनी भरलेला हा प्रवास खरंच प्रत्येकाच्या मनात घर करून गेला.