Sawantwadi Railway Station-Terminus

Sawantwadi Railway Station-Terminus This is a budding page of *Sawantwadi Railway Station.* you can chek in here, review and like page for latest updates from railway station.
(1)

उत्पन्नाची टांकसाळ, तरीही सुविधांची वानवा, सावंतवाडी रेल्वे स्थानकाची कोकण रेल्वेकडून उपेक्षा!निसर्गरम्य पर्यटन आणि ऐतिह...
29/04/2026

उत्पन्नाची टांकसाळ, तरीही सुविधांची वानवा, सावंतवाडी रेल्वे स्थानकाची कोकण रेल्वेकडून उपेक्षा!

निसर्गरम्य पर्यटन आणि ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी शहराला जोडणारे रेल्वे स्थानक कोकण रेल्वेसाठी उत्पन्नाची मोठी खाण ठरत आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न आणि लाखोंची प्रवासी संख्या असूनही प्रवाशांच्या पदरी मात्र निराशाच पडत आहे. २०१५ मध्ये भूमिपूजन होऊनही टर्मिनसचे स्वप्न अद्याप कागदावरच असून, सुविधांबाबत कोकण रेल्वे महामंडळ आणि रेल्वे बोर्डाची सापत्न वागणूक कायम असल्याची संतप्त भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

तळकोकणातील दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या प्रमुख तालुक्यांसाठी सावंतवाडी रेल्वे स्थानक अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्थानकावरून शिरोडा बीच, आंबोली हिलस्टेशन, वेंगुर्ला बंदर या पर्यटनस्थळांसह धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्यांची वर्दळ मोठी असते. सावंतवाडीची लाकडी खेळणी आणि गंजिफा कला देश-विदेशात प्रसिद्ध असल्याने, कोकण रेल्वेशी जोडल्या गेलेल्या या शहराचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

*टर्मिनसचे भिजत घोंगडे.*
कोकणात येणारी वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन केवळ कोकणासाठी स्वतंत्र गाड्या सोडता याव्यात यासाठी २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तसेच आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे थाटामाटात भूमिपूजन झाले. मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि महामंडळाच्या उदासीनतेमुळे टर्मिनसचे काम रखडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, डिसेंबर २०२५ मध्ये *कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चक्क 'सावंतवाडी टर्मिनसचा पुरावा द्या',* असा अजब सवाल प्रवासी संघटनेला केल्याने प्रशासनाची अनास्था उघड झाली.

*उत्पन्नात घसघशीत वाढ, तरीही टाळाटाळ..?*💹
माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, सावंतवाडी स्थानक महसुलाच्या बाबतीत आघाडीवर आहे,
*आर्थिक वर्ष २०२४-२५:* या वर्षात स्थानकाचे उत्पन्न १६ कोटी १६ लाख रुपये होते. एकूण ७ लाख ९९ हजार प्रवाशांनी (प्रतिदिन सरासरी २,१९१) या स्थानकाचा वापर केला.
*आर्थिक वर्ष २०२५-२६:* या वर्षी उत्पन्नात १२.७९ टक्क्यांनी वाढ होऊन ते १७ कोटी ८२ लाखांवर पोहोचले आहे. प्रवासी संख्येतही १२.४१ टक्क्यांची वाढ झाली असून, तब्बल ८ लाख ६२ हजार २२ प्रवाशांनी (प्रतिदिन सरासरी २,३८६) येथून प्रवास केला.
इतके भरघोस उत्पन्न देऊनही महामंडळ साध्या प्रवासी सुविधा देण्यास टाळाटाळ का करत आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

प्रवासी संघटनेच्या लढ्याला यश.✊
सुविधांच्या अभावाविरोधात कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने (सावंतवाडी) सातत्याने आंदोलने आणि पाठपुरावा केला. या रेट्यामुळे काही सकारात्मक बदलही दिसून आले आहेत.
१. वांद्रे-मडगाव द्विसाप्ताहिक गाडीला थांबा देण्यात आला तसेच नागपूर-मडगाव एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत करण्यात आला आहे.
२. पीआरएस (PRS) सुविधा पूर्णवेळ सुरू करण्यात आली असून टर्मिनसला जोडणाऱ्या रस्त्याचे कामही पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली आहे.
३. अलीकडेच डिजिटल इंडिकेटर कार्यान्वित झाले असून प्रवाशांसाठी लिफ्टचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच, निवारा शेडचे कामही लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे.

नव्या थांब्यांना रेल्वे बोर्डाचा 'लाल कंदील'🛑, कोकण रेल्वे महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह..?❓

कोरोना काळात रद्द करण्यात आलेले 'राजधानी' आणि 'गरीब रथ' एक्स्प्रेसचे थांबे अद्याप पूर्ववत झालेले नाहीत, हा कोकणवासीयांवर अन्याय आहे. १२ जुलै २०२५ च्या पत्रानुसार, कोकण रेल्वेने सावंतवाडीसाठी काही नव्या गाड्यांच्या थांब्यांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. मात्र, रेल्वे बोर्डाच्या लालफीतशाहीत हा प्रस्ताव अडकून पडला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील इतर स्थानकांना नवीन थांबे मिळत असताना, भरघोस उत्पन्न देणाऱ्या सावंतवाडीलाच उपेक्षित का ठेवले जाते? हा तिढा अद्याप सुटलेला नाही. आतातरी रेल्वे बोर्ड, रेल्वे महामंडळ सावंतवाडीला न्याय देईल का, अशी भाबडी आशा येथील जनता बाळगून आहे.

माहितीसाठी जनहितार्थ,

सागर तळवडेकर
उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.

*प्रसिद्धीपत्रक / प्रेस नोट**दादरमध्ये 'महाराष्ट्र रेल्वे परिषद' मोठ्या उत्साहात संपन्न; प्रलंबित मागण्या आणि रेल्वे विक...
27/04/2026

*प्रसिद्धीपत्रक / प्रेस नोट*

*दादरमध्ये 'महाराष्ट्र रेल्वे परिषद' मोठ्या उत्साहात संपन्न; प्रलंबित मागण्या आणि रेल्वे विकासावर सविस्तर मंथन.*

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि राज्यातील रेल्वेच्या विकासाला गती देण्यासाठी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात *'महाराष्ट्र रेल्वे परिषद'* नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.*'गतिमान महाराष्ट्र, समृद्ध कोकण'** हे महत्त्वपूर्ण ब्रीदवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत राज्यातील रेल्वे अभ्यासक, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांनी एकत्र येत प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर मंथन केले.

*परिषदेतील प्रमुख घडामोडी आणि चर्चा:*
*चतुःसूत्रीवर आधारित थेट संवाद -* संपर्क, सुसंवाद, सतर्कता आणि समस्या निवारण या सूत्रांवर आधारित या परिषदेत प्रामुख्याने मुंबई-कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागातील रेल्वे प्रवासातील तांत्रिक अडचणी, गाड्यांची संख्या वाढवणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

*एकजुटीचा निर्धार -* रेल्वे प्रवाशांना येणाऱ्या दैनंदिन अडचणींचे निवारण करण्यासाठी सर्व प्रवासी संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्धार यावेळी करण्यात आला.

*परिषदेत प्रशासनासमोर मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:*

*बंद गाड्या तातडीने पूर्ववत करणे:* कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजर, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मुंबई-विजापूर पॅसेंजर, पुणे-पनवेल पॅसेंजर यांसह इतर ३० गाड्या त्वरित पूर्ववत कराव्यात. नांदेड व हरंगुळ (लातूर) एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंत वाढवणे, आदी.

*प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणे:* कोकणासाठी प्रस्तावित सावंतवाडी येथील स्वतंत्र टर्मिनस सुविधा गेली १० वर्षे रखडले, ते प्राधान्याने मार्गी लावावे.
तातडीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे तसेच संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे.
*नव्या मार्गांना प्राधान्य:* सावंतवाडी-बेळगाव, छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव, मानवत रोड - परळी आणि जालना-जळगाव यांसारख्या रेल्वे मार्गांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.
*प्रवासी सुरक्षा आणि सुविधा:*
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ प्रवासासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात याव्यात.

*तांत्रिक मागण्यांचा पाठपुरावा -* रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या तांत्रिक मागण्यांचा त्वरित पाठपुरावा करून त्या मार्गी लावाव्यात.
*मान्यवरांची उपस्थिती आणि फलश्रुती -*
या परिषदेसाठी राज्याच्या विविध भागांतून रेल्वे प्रेमी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादर येथील सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत रेल्वेच्या भविष्यातील वाटचालीवर अनेक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
या परिषदेमुळे रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना आता एक प्रबळ व्यासपीठ मिळाले असून, आगामी काळात रेल्वे प्रशासनाकडून या रास्त मागण्यांवर सकारात्मक निर्णयांची अपेक्षा सर्वच स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

सदर परिषदेला माजी खासदार विनायक राऊत व खासदार अरविंद सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली. दोघांनीही वरील सर्व मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून रेल्वे मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे मान्य केले आहे. तसेच. श्री. अरविंद सावंत यांनी दादर रत्नागिरी, मुंबई सावंतवाडी, मुंबई पंढरपूर, नांदेड पुणे या गाड्यांसाठी मध्य रेल्वेला १० दिवसांची मुदत दिली असून ३ मे नंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याचा पुनरुच्चार केला.

सदर परिषदेला कोंकण विकास समिती, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ, मराठा ऑर्गनायझेशन, कोकण कृती समूह, जल फाउंडेशन, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबई, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी, वैभववाडी तालुका विकास मंच, रेल्वे प्रवासी संघटना बदलापूर, गडगडी धरण कृती समिती, मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती, रत्नागिरी सुवर्णदुर्ग विकास परिषद, राजापूर तालुका शेतकरी, मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती परभणी, रेल्वे प्रवासी मित्रमंडळ बदलापूर, सिंधुदुर्ग रहिवाशी हितवर्धक संघ पनवेल, आधार इंडिया, मराठी अभ्यास केंद्र, निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर, महाराष्ट्र राज्य प्रवासी प्रकोष्ठ, रेल्वे विकास समिती, गौरी गणपती उत्सव ठाणे, सिंधुदुर्ग मराठा विकास मंडळ ठाणे, नाना शंकरशेठ संघर्ष समिती, रेल्वे प्रवासी सेल बार्शी, कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघ, शहीद अशोक कामटे बहुद्देशीय संस्था सांगोला, हिंद मजदूर किसान पंचायत, सिंधुदुर्ग जिल्हा सेवाभावी संस्था, दिवा शहर, कोकण रेल्वे प्रवासी संघटना वैभववाडी, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे, पश्चिम महाराष्ट्र रेल्वे, श्री समर्थ शक्ती प्रतिष्ठान या संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
#महाराष्ट्र


#कोकणचा_हक्क #महाराष्ट्ररेल्वेपरिषद
#सावंतवाडी #मुंबई #दादर #रत्नागिरी #कोल्हापूर #मराठवाडा #सांगोला #परभणी #खेड #पुणे

18/04/2026

🚨 कोकणी माणसाचा संताप! आमच्याच हक्काच्या रेल्वेत आम्हीच भिकारी? 🚨

खिशात स्वतःच्या घामाच्या पैशाने काढलेले *'कन्फर्म तिकीट'* असूनही काल *रत्नागिरी स्थानकावर* एका मराठी तरुणाला गाडीतून अक्षरशः बाहेर राहावे लागते.! *कारण गोव्यातून बिहारला जाणारी ट्रेन आधीच खच्च भरून आलेली होती..!!* हा अपमान आता सहन करायच्या पलीकडे गेला आहे. आपल्याच भूमीत, आपल्याच राज्यात कोकणी माणसाला ही अशी लाथाडलेली, भिकाऱ्यासारखी वागणूक रेल्वे प्रशासन आणखी किती काळ देणार?

*रोज हजारो परप्रांतीय आणि परराज्यातील गाड्या आमच्या कोकणाच्या छाताडावरून धावतात, पण आमच्या कोकणी माणसाला स्वतःच्याच गावी जायला साधी बसायला जागा मिळत नाही?* आता बस्स! आम्हाला या परराज्यातून खच्चून भरून येणाऱ्या गाड्यांच्या तुकड्यांवर आणि उरल्या-सुरल्या जागेवर जगायचे नाही. *ज्या कोकण रेल्वेसाठी आमच्या बापजाद्यांनी जमिनी दिल्या, त्या रेल्वेवर पहिला हक्क फक्त आणि फक्त मराठी माणसाचाच आहे!*

*आम्हाला गोव्यावर किंवा दक्षिणेकडून येणाऱ्या गाड्यांवर अवलंबून राहायचे नाही. जोपर्यंत गाड्या मडगाव (गोवा) किंवा इतर राज्यांतून सुटतील, तोपर्यंत मराठी माणसाला डब्यात घुसायलाही जागा मिळणार नाही, हे त्रिवार सत्य आहे.*

👉🏼*यावर एकमेव ठोस उपाय म्हणजे, केवळ आणि केवळ महाराष्ट्रापुरत्या (कोकणासाठी) धावणाऱ्या स्वतंत्र हक्काच्या गाड्या! त्यासाठी हवे हक्काचे टर्मिनस.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आताच्या आता पूर्ण क्षमतेने सुरू झालेच पाहिजे! तिथेच गाड्यांची देखभाल आदी सुविधा पूर्ण केलीच पाहिजे. मग गाड्या गोव्याला किंवा परराज्यात जातीलच कशाला??
त्या सावंतवाडीतूनच सुटतील आणि तिथेफक्त आमच्या माणसांचा हक्क असेल!

➡️*टर्मिनस का हवे याचे कारण वरील व्हिडिओ पहा, त्यात रेल्वे अभ्यासक श्री अक्षय महापदी यांनी तांत्रिक मुद्दे स्पष्ट केले आहेत.

हा अन्याय असाच मुकाट्याने सहन करत राहिलात, तर भविष्यात कोकण रेल्वेच्या फलाटावर उभं राहायलाही आपल्याला जागा उरणार नाही. रेल्वे प्रशासनाची ही दादागिरी आणि मराठी माणसाला गृहीत धरण्याची सवय आता मोडून काढली पाहिजे.

📣 आता वेळ विनंत्या करण्याची नाही, तर हक्क हिसकावून घेण्याची आहे! 📣

🗓️ २६ एप्रिल रोजी दादर (मुंबई) येथे सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणारी 'महाराष्ट्र रेल्वे परिषद' ही आता आरपारच्या लढाईची हाक आहे!

रेल्वे प्रशासनाला आणि झोपलेल्या व्यवस्थेला आता कोकणी माणसाचा हिसका दाखवण्याची वेळ आली आहे. जर आमच्या हक्काच्या गाड्या सावंतवाडीतून सुटणार नसतील, तर आम्ही शांत बसणार नाही, हा इशारा देण्याची हीच वेळ आहे.

🔥 हा संतापाचा लाव्हारस प्रत्येक कोकणवासीयाच्या आणि मराठी माणसाच्या मोबाईलवर धडधडलाच पाहिजे! जास्तीत जास्त शेअर करा, पेटून उठा! 🔥

🚩 जय महाराष्ट्र! जय कोकण! 🚩

Avinash Jadhav MNS

🚨 कोकणवासीयांनो, आता तरी जागे व्हा! आपल्या हक्कासाठी एल्गार पुकारण्याची वेळ आली आहे! 🚨आज आपल्या हक्काची रेल्वे परप्रांती...
16/04/2026

🚨 कोकणवासीयांनो, आता तरी जागे व्हा! आपल्या हक्कासाठी एल्गार पुकारण्याची वेळ आली आहे! 🚨

आज आपल्या हक्काची रेल्वे परप्रांतीय आणि गोव्याच्या पर्यटकांच्या घशात घातली जात आहे. आपल्यावर होणारा सर्वात मोठा अन्याय म्हणजे *'सावंतवाडी टर्मिनस'!*

गेली अनेक वर्षे सावंतवाडी टर्मिनसचा प्रकल्प मुद्दाम रखडवून ठेवला आहे. याचा थेट फटका कोणाला बसतोय? तर सामान्य कोकणी माणसाला!

सावंतवाडी टर्मिनस नसल्यामुळे कोकणात येणारी प्रत्येक गाडी थेट गोव्याला पळवली जाते. गोव्यातील पर्यटक आणि परप्रांतीय भैय्यांच्या प्रचंड गर्दीमुळे कोकणी माणसाला स्वतःच्याच गाड्यांमध्ये तिकीट मिळत नाही. सणासुदीला आपल्याला वेटींग लिस्टवर राहावे लागते, धक्के खात प्रवास करावा लागतो आणि परप्रांतीय मात्र हक्काच्या सीटवर मजेत प्रवास करतात. जर सावंतवाडी टर्मिनस तातडीने पूर्ण झाले, तर गाड्या तिथूनच सुटतील आणि आपल्या कोकणी माणसाला हक्काची सीट मिळेल! *पण हा प्रकल्प जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून महाराष्ट्राचा फायदा परराज्यांना दिला जात आहे.*

एवढेच नाही, तर कोरोना काळात बंद केलेली आपली हक्काची दादर-रत्नागिरी पॅसेंजर, सह्याद्री एक्सप्रेस आणि हडपसर-नांदेड एक्सप्रेस आजही बंदच आहेत. किंवा मुख्य स्थानकापासून त्या गाडीला बाहेर फेकले आहे. आणि त्याजागी परप्रांतात जाणाऱ्या गाड्यांना जागा दिली आहे.
*कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण आणि कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र हद्दीचे संपूर्ण दुहेरीकरण* ही आताची गरज आहे. परंतु रेल्वे प्रशासन आणि मंत्रालय यावर सकारात्मक नाहीच असेच दिसते.
*या सर्व अन्यायाचा जाब विचारण्यासाठी आणि सावंतवाडी टर्मिनसच्या लढ्याला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलेच पाहिजे.*

*आता पर्यंत मला साथ देणाऱ्या सावंतवाडी टर्मिनस प्रेमींनो..!* आपल्या हक्कासाठी, आपल्या भावी पिढीसाठी या 'महाराष्ट्र रेल्वे परिषदेला' मोठ्या संख्येने उपस्थित राहा! ही कळकळीची विनंती.

🗓 दिनांक: २६ एप्रिल २०२६, सकाळी १० वाजल्यापासून.
📍 ठिकाण: सुरेंद्र गावस्कर सभागृह, दुसरा मजला, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, अग्निशमन दलाच्या शेजारी, दादर (पूर्व), मुंबई - ४०००१४.

आयोजक: अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र.

*🙏 नम्र आवाहन: हा लढा एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण कोकणाचा आणि महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या आणि कोकणवासीयाच्या व्हॉट्सॲपवर हा मेसेज पोहोचलाच पाहिजे. कृपया हा मेसेज जास्तीत जास्त ग्रुप्सवर फॉरवर्ड करा! 🚩*

सागर तळवडेकर
उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.
कार्यकारिणी सदस्य, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र.

🚨 कोकणचा आक्रोश :  आमच्या घरात आम्हीच उपरे..?? आम्हाला मडगाव (गोवा) ला जाणाऱ्या गाड्या नकोच! 🚨:- सर्व लोकप्रतिनिधींना आण...
02/04/2026

🚨 कोकणचा आक्रोश : आमच्या घरात आम्हीच उपरे..?? आम्हाला मडगाव (गोवा) ला जाणाऱ्या गाड्या नकोच! 🚨
:- सर्व लोकप्रतिनिधींना आणि रेल्वे प्रशासनाला कळकळीची विनंती.

मुंबईहून मडगावपर्यंत धावणाऱ्या गाड्यांमुळे सातत्याने कोकणी माणसावर अन्याय होत आहे. *"गोवा म्हणजे कोकण नव्हे!"* गोव्याला जाणाऱ्या गाड्यांना आता आमचा तीव्र विरोध आहे. कोकण भूमीवरून परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना विरोधच.

काय आहे कोकणवासीयांची व्यथा?

😡 गोव्याचा पर्यटकांची चंगळ आणि कोकणी माणसाची फरफट!: गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांचा प्रचंड ओढा असल्यामुळे मडगाव आणि थिवीम स्थानकावर नेहमीच अलोट गर्दी असते. या पर्यटकांमुळे *'कोकणकन्या' आणि 'मांडवी'* एक्सप्रेसमध्ये कोकणच्या स्थानिक जनतेला साधी तिकिटेही मिळत नाहीत. *सणासुदीला तर 'Waiting List' कधीच क्लिअर होत नाही.*

❌ नावापुरत्या जलद गाड्या:
प्रशासनाने *'तेजस' आणि 'वंदे भारत'* सारख्या अत्याधुनिक गाड्या सुरू केल्या, *पण त्याचा कोकणी माणसाला काय उपयोग? या गाड्यांना कोकणात जेमतेम २-३ थांबे दिले जातात.* या *गाड्या फक्त आणि फक्त गोव्याच्या पर्यटकांसाठीच चालवल्या जातात का?*

आमच्या प्रमुख मागण्या:
✅ कोकण मर्यादित गाड्या सोडा: -
गाड्या केवळ रत्नागिरी आणि सावंतवाडीपर्यंतच सोडण्यात याव्यात.
✅ 'तुतारी' सारखी गाडी हवी:
दादर ते सावंतवाडीपर्यंत धावणारी 'तुतारी एक्सप्रेस' ही खऱ्या अर्थाने कोकणची जीवनवाहिनी आहे. ही गाडी कोकणातील सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर थांबते. अशा प्रकारच्या कोकण मर्यादित जास्तीत जास्त गाड्या सुरू करा, जेणेकरून कोकणी माणसाला आपल्या हक्काची आणि खात्रीशीर जागा मिळेल.
✅सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करा:
कोकणी लोकांसाठी सावंतवाडी टर्मिनस हा आमचा हक्क आहे! या टर्मिनसचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून तेथूनच गाड्यांचे संचलन सुरू करा, जेणेकरून गोव्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.

कोकणी माणसाच्या हक्कासाठी हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवा! 🚩

*विचार करा..!!*
*आता नाही तर पुन्हा कधीच नाही.*

#कोकण_रेल्वे #कोकणचा_हक्क

पुणे तिथे काय उणे..??मराठी जनतेला काय वाटत..?? आपले विचार नक्की मांडा.पुणे ते सावंतवाडीला लाल बावटा.महाराष्ट्रातील इतर ग...
31/03/2026

पुणे तिथे काय उणे..??

मराठी जनतेला काय वाटत..?? आपले विचार नक्की मांडा.

पुणे ते सावंतवाडीला लाल बावटा.
महाराष्ट्रातील इतर गाड्या पुण्याचा बाहेर फेकल्या.
परराज्यातील गाड्यांना पुणे स्थानकात प्रवेश.

29/03/2026

कोकणासाठी केवळ तीन गाड्या आहेत: १.दादर - सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस, २.दिवा - सावंतवाडी एक्सप्रेस, ३.दिवा - रत्नागिरी पॅसेंजर.
इतर गाड्या गोवा, कर्नाटक आणि केरळसाठी आहेत.
गाडी इतर राज्यांची असल्याने तिकीट कोटा देखील इतर राज्यांचा..!

🚨 पुणे-कोकण रेल्वेला 'खो' आणि बिहारच्या गाड्यांना 'ओ'! मध्य रेल्वेचा मराठी माणसावर उघड अन्याय! 🚨रेल्वे प्रशासनाकडून महार...
28/03/2026

🚨 पुणे-कोकण रेल्वेला 'खो' आणि बिहारच्या गाड्यांना 'ओ'! मध्य रेल्वेचा मराठी माणसावर उघड अन्याय! 🚨

रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राची आणि विशेषतः कोकणी चाकरमान्यांची सतत फसवणूक सुरूच आहे. दादर रत्नागिरी पॅसेंजर नंतर आता पुण्यातून कोकणासाठी गाडी नाकारून, मध्य रेल्वेने आता थेट बिहारसाठी 'अमृत भारत एक्सप्रेस' सुरू करत मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

काय आहे मध्य रेल्वेचा नवा डाव ?

१. खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे-कोकण दरम्यान रोजची ट्रेन सुरू करण्याची मागणी केली असता, मध्य रेल्वेने पुण्यात 'टर्मिनलची अडचण' आणि 'मार्गाची अडचण' (Path constraints) असल्याचे कारण सांगून कोकणच्या गाडीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

२. पण संतापाची बाब म्हणजे, याच 'अडचणी' असलेल्या पुणे स्टेशनवरून ११४३१/११४३२ पुणे-दानापूर (बिहार) अमृत भारत एक्सप्रेस मंजूर करण्यात आली आहे. जी आधी स्पेशल म्हणून सुरू होती.

३. विशेष म्हणजे ही गाडी 'मध्य रेल्वेच्या मालकीची' (CR Owning) आहे. याचा सरळ अर्थ असा की, या बिहारला जाणाऱ्या गाडीचे मेंटेनन्स (देखभाल) पुण्यातच होणार आहे.

४. पुण्यात आधीच जागा नसताना हा मेंटेनन्स आणि पार्किंगचा स्लॉट बिहारच्या गाडीला दिल्यामुळे, आता भविष्यात महाराष्ट्रातील किंवा कोकणातील गाड्यांसाठी मध्य रेल्वेकडे क्षमताच उपलब्ध राहणार नाही! हा कोकणवासीयांवर अन्याय नाही तर काय आहे?

*पैसा महाराष्ट्राचा, फायदा परप्रांतीयांचा?*
कोणत्याही नवीन रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्र राज्य शासन ५०% आर्थिक वाटा उचलते. मग या रेल्वे प्रकल्पांचा आणि पायाभूत सुविधांचा पहिला फायदा राज्यातील जनतेला, इथल्या भूमिपुत्रांना व्हायला नको का? आपल्याच घामाच्या पैशातून उभ्या राहिलेल्या सुविधांचा लाभ उत्तरेकडील राज्यांना का?

*महाराष्ट्रातील गाड्यांना सापत्न वागणूक!*
हा दुजाभाव केवळ कोकणापुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रांतर्गत धावणाऱ्या 'नांदेड-पुणे' आणि 'पुणे-हरंगुळ' एक्सप्रेस यांसारख्या हक्काच्या गाड्या मुख्य पुणे स्टेशनवरून चक्क बाहेर 'हडपसर'ला फेकल्या गेल्या. स्वतःच्याच राज्यातील प्रवाशांना अशी दुय्यम वागणूक का? परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना मुख्य स्टेशनवर रेड कार्पेट आणि महाराष्ट्राच्या गाड्यांना मात्र हद्दपारी? मध्य रेल्वे महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर एवढा दुजाभाव का करत आहे?
मराठी माणसाची आणि कोकणी चाकरमान्यांची ही गळचेपी आता सहन करण्यापलीकडे गेली आहे. हा अन्याय असाच खपवून घ्यायचा का?

(हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा आणि या अन्यायाविरुद्ध तमाम मराठी बांधवांनी एकत्र आवाज उठवा!) 📢🚆🚩

Ministry of Railways, Government of India
Central Railway

Mahesh Baliram Sawant
Avinash Jadhav MNS
Abhijeet Desai MNS - अभिजित देसाई

20/03/2026

महाराष्ट्र विधीमंडळ नियम १०१ अन्वये कोकण विकासावर चर्चा करताना आमदार श्री सुनील प्रभू यांनी कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्याची मागणी केली आणि आताच्या परिस्थितीचे वर्णन करताना वंदनीय शिवसेना प्रमुखांनी सण १९९८ ला कोकणी जनतेसाठी हावडा एक्सप्रेस बंद पाडून कुर्ला ते सावंतवाडी दरम्यान रेल्वे सेवा सुरू केली याचा उल्लेख केला..

वरील चर्चा विधानसभेत होत असताना कोकणची गाडी दादर - रत्नागिरी कायमस्वरुपी बंद करून त्याजागी दादर ते गोरखपूर गाडी कायम करण्यात आली.

↗️दिवा वरून सुटणाऱ्या गाड्या दादर वरूनच सुटल्या पाहिजेत.. अन्यथा कोकणी माणूस मुंबईत परका होईल.🚷

↗️दादर ते गोरखपूर एक्सप्रेसचा जाहीर निषेध..❌

आमदार श्री Sunil Prabhu - सुनिल प्रभु साहेब.
Ankit Sunil Prabhu - अंकित सुनिल प्रभु

19/03/2026

🚉 सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आणि कोकण रेल्वेच्या प्रश्नांवर आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत उठवला आवाज!

🔸 सावंतवाडी रेल्वे टर्मिनस करिता निधीची उपलब्धता शासनाने करावी आणि कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत लवकरात लवकर विलिनीकरण करण्यात यावे.
🔸 माजी पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांचे बाह्य सुशोभीकरण झाले, परंतु अंतर्गत सुविधा अद्याप अपूर्ण आहेत. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने या सुविधांसाठी निधीची तरतूद करावी. यासाठी मुख्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक आयोजित करण्याची विनंती केली.
🔸 पर्यटन आणि गाड्यांना थांबा: "ट्रेन जर थांबत नसेल तर पर्यटक कसे येणार?" असा थेट सवाल उपस्थित करत, कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन स्थानकांवर न थांबणाऱ्या गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

धन्यवाद आमदार श्री दीपक भाई केसरकर जी आतातरी कोकणचे हक्काचे टर्मिनस कार्यान्वित होईल असा विश्वास वाटतो. श्री Deepak Vasant Kesarkar जी.
CMOMaharashtra श्री Devendra Fadnavis साहेब तसेच पालकमंत्री श्री Nitesh Rane साहेब यावर नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील हा विश्वास आहे.

18/03/2026

मुंबईतील कोकणी चाकरमान्यांच्या हितासाठी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती सुलभाताई गायकवाड यांनी आज राज्याच्या अधिवेशनात (नियम १०१ अन्वये आयोजित चर्चेत) सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या प्रलंबित प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

सभागृहात मांडण्यात आलेले प्रमुख मुद्दे (मागण्या):
टर्मिनसचे काम: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करणे.
थांबे पूर्ववत करणे: कोरोना काळात सावंतवाडी स्थानकातून काढून घेण्यात आलेले रेल्वेचे थांबे पुन्हा सुरू करणे.
अमृत भारत योजना: सावंतवाडी स्थानकाचा समावेश केंद्राच्या 'अमृत भारत स्थानक योजनेत' करण्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करणे.
मार्गाचे दुहेरीकरण: कोकण रेल्वे मार्गाचे लवकरात लवकर दुहेरीकरण करणे.

विशेष पाठपुरावा:
या महत्त्वपूर्ण विषयांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी (मुंबई विभाग) चे अध्यक्ष श्री. विनोद नाईक यांनी सातत्याने आणि अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला आहे.

कोकणवासीयांचा विश्वास:
आमदार सुलभाताईंनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर राज्याचे मुख्यमंत्री नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील, असा आम्हा सर्व कोकणवासीयांना ठाम विश्वास आहे.

CMOMaharashtra श्री Devendra Fadnavis साहेब आपल्या सकारात्मक निर्णयाची प्रतिक्षा..!!🙏

Ministry of Railways, Government of India
Konkan Railway Corporation Ltd
धन्यवाद..!

आपलाच,
सागर तळवडेकर
उपाध्यक्ष,
कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.

18/03/2026

कोकण रेल्वेच्या प्रवासी सुविधांसंदर्भात खासदार श्री रवींद्र वाईकर साहेबांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला..!
त्या लगेच रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले.

कोकणातील रेल्वे प्रश्न देशाच्या संसदेत गाजत आहेत. हेच आम्हा प्रवासी संघटनाचे यशस्वी प्रयत्न आहेत.

रेल्वेमंत्री श्री Ashwini Vaishnaw साहेब.

श्री Ravindra Waikar साहेब.🧡🚩✌️

Ministry of Railways, Government of India Konkan Railway Corporation Ltd

Address

Sawantwadi
Savantvadi
416510

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sawantwadi Railway Station-Terminus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sawantwadi Railway Station-Terminus:

Share

Category