03/06/2025
एस्.टी. कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
३ जून २०२५ | मंत्रालय
आज ३ जून २०२५ रोजी, मंत्रालयात झालेल्या बैठकीत,
एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी खालील महत्त्वपू्र्ण निर्णय घेण्यात आले.
राज्यातील सर्व एस. टी. कर्मचारी संघटनांची विविध प्रश्नाबाबतची बैठक आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
▪️ एस.टी. कर्मचाऱ्यांना आता ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे.
▪️ एस. टी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा/प्रतिपूर्ती, वैद्यकीय तपासणी, समुपदेशन यासाठी धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना राबविवणार.
▪️ रु.५ लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ एस. टी कर्मचाऱ्यांना मिळणार.
▪️ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्यात येत असून वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास (पी.ए.एस.) रु.१ कोटी पर्यंत आणि पूर्ण अपंगत्व आल्यास रु. १ कोटी पर्यंत अपघात विमा मिळणार आहे.
▪️ एसटीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटीतून मोफत प्रवास करण्याचा पास देण्यात येईल.
मुंबई, दि. ३ : राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के .....