Saideep

Saideep Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saideep, Airport, Mumbai.

24/09/2015

प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता
तुम्हां रसिक वाचकांसाठी..........
("चांदणझुला" मधून... )

"बायको"

तिचं आपल्या आयुष्यात येणं,
किती किती सुखद असतं..!
या नात्याला श्वासांशिवाय,
दुसरं कुठलंच नाव नसतं...!!

एका सुंदर क्षणी आपल्या,
घरामध्ये येते "ती"...!
तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला,
भेट म्हणून देते "ती"...!!

किती सहज बनवत जाते,
ती प्रत्येकाशी नातं....!
बघता बघता अनोळखी घर,
तिचंच बनून जातं....!!

सुखामध्ये दुःखामध्ये,
'ती'च सोबत असते ना..!
सगळं सहन करून ती,
तुमच्यासाठीच हसते ना.?..!!

सकाळपासून रात्रीपर्यंत,
राबत असतात तिचे हात...!
सासू-सासरे, मुलं, घर..
सतत असतं तिच्या मनात...!!

चहा, दूध, नाष्टा, डबे,
आंघोळीला गरम पाणी...!
प्रत्येकाची करून कामे,
तिची मात्र मधाळ वाणी....!!

सगळ्यांत शेवटी झोपते ती,
सगळ्यांच्याही आधी उठून...!
दिवसभर राबण्यासाठी,
ताकद एवढी आणते कुठून.?..!!

घरामधलं सगळं आवरून,
कामांसाठी बाहेर पळते....!
घरामध्ये नसते तेंव्हाच,
तिची खरी किंमत कळते...!!

घर होतं अस्ताव्यस्त,
घरामध्ये नसते जेंव्हा....!
तिच्याशिवाय व्हायचं कसं...?
मनात आपसूक येतं तेंव्हा...!!

म्हणूनच ती परत येते,
घरामध्ये पदर खोचून....!
बोलून दाखवते मलाच ती,
वरती हे टोचून टोचून...!

की, "मी म्हणून टिकले..., दुसरी
केव्हाच गेली असती पळून....!
माझे महत्त्व येत नाही,
अजून कसे तुम्हांला कळून.?"..!!

राग-लोभ, रुसवे-फुगवे,
उणी-दुणी, मानपान...!
प्रत्येकाला घेते समजून,
जुळवून घेते कित्ती छान...!!

थकूनभागून आल्यावर ती,
हसून, चहा देते आणून...!
दिवसभराचे आपले कष्ट,
अलगदपणे घेते जाणून..!!

आयुष्यभर उपयोगी पडतं,
नेहमी तिचंच संसारी धोरण....!
म्हणून प्रत्येक घरात सजतं,
"बायको" नावाचं मखमली तोरण....!!

ती आहे म्हणून आहे,
आपल्या घरादाराला किंमत....!
तिला विरोध करण्याची इथं....
कुणात आहे हिंमत.?..!!

कुठून येतात आयुष्यात आपल्या,
इतक्या समजूतदार मुली.?..!
उगाच नाही म्हणत...
" घरोघरी मातीच्याच चुली...!!"

क्षणांचीही साथ नव्हे,
साताजन्मांची ही सोबत असते....!
"नवरा" आयुष्यभर "नवरा"च राहतो,
"नवरी मुलगी" मात्र "बायको" बनते....!!

गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृ...
17/09/2015

गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक
शुभेच्छा....
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.
॥गणपती बाप्पा मोरया॥

09/09/2015

😌😌 कालबाह्य परंपरा 😌😌

मित्रांनो, वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला, तो याप्रमाणे...

एका खोली मध्ये 8-10 माकडांना ठेवण्यात आले.

त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर 🍌🍌 केळीचा एक घड लटकत ठेवण्यात आला.

थोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या 🍌🍌🍌 घडाकडे जाते

आणि

ते माकड शिडी चढून केळीकड़े जाण्याच्या प्रयत्न करते .

तोच त्याच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते व इतर
उरलेल्या माकडांवर सुद्धा पड़ते
आणि
शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करणारे माकड खाली परत येतं.

दुसऱ्या दिवशी दुसरे एक माकड असाच प्रयत्न करते , तेंव्हा सुद्धा त्याच्या अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते.

असे सतत 3-4 दिवस घडते, त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की, केळीकड़े धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे.

मग पाचव्या दिवशी जेंव्हा पुन्हा एक माकड केळीसाठी शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करते
तेंव्हा

इतर सर्व माकडे मिळून त्याला झोडतात त्यामुळे ते माकड परत येउन कोपर्‍यात जाऊन बसते.

यामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही.

पुढील 3-4 दिवस असे सतत घडते.
कोणी माकड शिडीकडे वळले की इतर सर्व माकडे मिळून त्याला मारायचे.

अशाप्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही केळीकड़े बघायला सुद्धा तयार नाही.

तेंव्हा मग वैज्ञानिकांनी गरम पाणी घालणेच बंद केले.

मग वैज्ञानिकांनी त्या माकडांपैकी एक माकड बाहेर काढले

आणि

दुसरे एक नवीन माकड आत टाकले.

या नवीन माकडाने केळी 🍌 नजरेत पडताच शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला तोच जुनी सर्व माकडं मिळून त्या नवीन माकडाला झोडू लागलीत.

दुसर्‍या दिवशी वैज्ञानिक जुन्या माकडांपैकी आणखी एक माकड बाहेर काढून नवीन एक माकड आत टाकतात.

हे दुसरे नवीन माकड देखील केळी बघून शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करताच इतर सर्व माकडं त्याला झोड़तात.

पण यात विशेष हे असते की काल आलेले नविन माकड सुद्धा या झोडणाऱ्या माकडात सामील असते ज्याच्या अंगावर कधीही गरम पाणी पडलेले नसते.

आता मारणाऱ्याला माहीत नाही
आपण का मारत आहोत?
आणि
मार खाणाऱ्याला माहीत नाही आपण का मार खात आहोत?

या नंतर वैज्ञानिक दररोज जुने माकड काढून नवीन माकड आत घालतात.

आणि

रोज तोच प्रकार घडतो.

नवीन माकड केळीसाठी शिडीकड़े वळले की,

उर्वरित सर्व माकडं त्याला मारतात.

मारणार्‍या माकडांमध्ये जुनी माकडं ज्यांना माहीत होतं की आपण का मारत आहोत आणी
त्यांच्यासोबतच नवीन माकडं ही सामील होती ज्यांनी कधीही गरमा-गरम पाणी अंगावर झेलले नव्हते.

अशा प्रकारे दररोज एक एक करून सर्व जुनी माकडं बाहेर काढून नवीन माकडं आत घालण्यात येतात.

प्रत्येक नवीन येणाऱ्या माकडाला शिडी चढण्याचा प्रयत्न केल्यास मार पडत असतो .

आता मात्र खोलीमध्ये सर्व नवीन माकडं असतात ज्यांनी कधीही त्या खोलीत अंगावर गरम पाणी पडण्याचा प्रकार पाहिलेला नसतो.

पण जर कोण्या एखाद्या माकडाने शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला की, इतर सर्व माकडं त्याला मारतात.

कारण आता ही प्रथा तिथे रूढ़ झालेली असते,

आपण का मारत आहोत याचे मूळ कारण माहीत नसून सुद्धा, फ़क्त कोणी त्या शिडीकड़े वळला की त्याला मारायचे बस्स एवढेच सर्वाना माहीत !!!

बोध:-
माणसांचे ही असेच आहे, आपण अनेक रुढी परंपरा मानतो.

पण आपल्याला त्यांचे मूळ कारण माहीतच नसते.

कारण त्या रुढी परंपरा सुरु झाल्या तेव्हा आपण नव्हतो , म्हणून आपण इतर लोकं करतात म्हणून करतो.

त्यामागची कारणे हेतू आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.

बरं , जी कारणे आम्हाला सांगण्यात येतात ती ही निसर्ग नियमानुसार , विज्ञानाच्या नियमानुसार पटणारी नसतात, शिवाय तर्काधिष्टित तर अजिबात नसतात. तरी सुद्धा आम्ही त्या माकडांसारखे "अंधानुकरण" करतो आणि स्वतःला 21व्या शतकातील , विज्ञान युगातील सुशिक्षित व्यक्ती समजतो.

म्हणून कोणतीही गोष्ट, रुढी, परंपरा यांच्या मागचे कारण नीट समजून, ते वैज्ञानिकदृष्टया, तार्किकदृष्टया खरे आहे किंवा नाही हे जाणून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास करू नये.

फ़क्त इतर लोक असे करतात म्हणून आपण ही करतो , तर मग काही अर्थच नाही आपण घेतलेल्या शिक्षणाचा...!!!!!

मग माकडंच बरी
👇
🐵🐵🐵🐵🐵🐵🐵

08/09/2015

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.

त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.

दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.

पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.

तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.

वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.

फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.

यालाच 'जीवन' म्हणतात.......

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..!!

जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत..!!

चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात..!!

तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत..!!

वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत..!!

पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत...!!

हसायला गेल तर
रडणेही आपल असत .....!!

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..
🔹नाती जपण्यात मजा आहे
🔸बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
🔹जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
🔸येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
🔹नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
🔸येताना काही आणायचं नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी जन्मायचं असतं...
!!!!!!!!!!

पैसे नसतात तेव्हा माणूस
झाडपाला खाऊन दिवस काढतो
पैसा आल्यावर
हाच झाडपाला सलाड म्हणून हॉटेला त खातो

पैसे नसतात तेव्हा
माणूस सायकलने रपेट करतो,
पैसा आल्यावर मात्र
हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा
रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते.
पैसे आल्यावर मात्र
हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी
लग्न करायला एका पायावर तयार असतो,
ऐपत असली की मात्र
त्याला घटस्फोट हवा असतो.

पैसे वाचवायला
तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की
सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा
तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र
कंगाल असल्याचे नाटक करतो.

पैसे नसतात तेंव्हा
मिठाई खावीशी वाटते
पैसे आल्यावर
मधुमेहा मुळे खाता येत नाही.

पैसे नसतात तेंव्हा
भूक लागते , झोप येते
पैसे आल्यावर
दोन्हीसाठी औषध घ्यावे लागते
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥
!!!!!!!!
मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण
माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यूनंतर
मी कमावलेली संपत्ती
मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही,
परंतु
मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील
अश्रूंचा एक थेंब हाच
माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच
माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई
असेल...
तुमचे आणि माझे हे नाते
माझ्यासाठी अनमोल आहे ...
आज प्रत्येकजन आपली गाडी झाडाच्या सावलीत
लावायची खटपट
करतो,
पण लहानस रोपट लावण्याची खटपट कुणीच करत
नाही..!

07/09/2015

नमस्कार, थोडंस महत्वाचं
पाणी जपुन वापरा. पाण्याचा अपव्यय टाळा. आता सप्टेंबर महीना चालु आहे ...
पुढच्या वर्षी जुन मध्ये पाऊस पडला तरी अजुन आपल्याला ८ महीने राहीलेल्या पाणीसाठ्याचा जपुन वापर करावा लागणार आहे . दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घ्या . सरकार, विरोधी पक्ष, मिडियावाले किंवा मोदी यांच्या दौरा, आंदोलन किंवा जेलभरो मुळे प्रश्न सुटणार नाहीये. प्रत्येकाला येणाय्रा संकटाला सामोरे जाण्यासाठी जाणीवपुर्वक काळजी घ्यावी लागणार आहे .
१) नळ बंद ठेवावेत, अावश्यक तेवढाच पाणीसाठा करुन ठेवावा .
२) पाणी शिळे होत नाही, ते ओतुन देऊ नका, हव तर त्याचा कपडे , भांडी धुण्यासाठी वापर करावा .
३) थोड़े खराब असलेले पाणी ओतुन न देता झाडांना घालावे .
४) रस्ते, गाड्या, पार्किंग धुण्यासाठी पाणी वाया घालवु नये .
५) हौस -शौक कमी करुन , दुष्काळग्रस्त बांधवांसाठी सढळ हाताने मदत करा .

येणारा काळ कसोटीचा आहे . राजकीय हेवेदावे, स्वार्थ बाजुला ठेवुन, एकजुटीने सहकार्य करा. आणि आपल्या माणुसकी , बौद्धिक, वैचारिक दृष्टीकोनाचे दर्शन जगाला दाखवुन देऊयात .
हा मेसेज सर्वांना शेअर करा व स्वत:पासून, कुटुंबापासुन
याची अंमलबजावणी करा.
- एक सुजाण नागरिक

28/08/2015

Awesome msg.

Ek Sach Chupa Hota Hai :- Jab Koi Kisi Ko Kehta Hai Ki "Mazaak Tha Yaar".

Ek Feeling Chupi Hoti Hai :- Jab Koi Kehta Hai "Mujhe Koi Farq Nahi Padta".

Ek Dard Chupa Hota Hai :- Jab Koi Kehta Hai "Its Ok".

Ek Zarurat Chupi Hoti Hai :- Jab Koi Kehta Hai "Mujhe Akela Chhod Do".

Ek Gehri Baat Chupi Hoti Hai :- Jab Koi Kehta Hai "Pata Nahi".

Ek Samundar Chupa Hota Hai Baato Ka :- Jab Koi "Khamosh Rehta Hai".....

Isi liye ek Open Heart Surgery unit k baahar likha huwa tha k...."Agar Dil Khol Lete Apne Yaaro Ke Saath,To Aaj Kholna Na Padta Auozaro K Saath".


"Share Life With True Friends"

12/08/2015

आपण नाटक पहायला गेलो तर पुढली सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची.
तुमचं जगातलं स्थान असच सापेक्ष असत! ते अविचल कधीच नसतं!
साबण बनवायला तेल जरूरी आहे आणि तेल काढायला साबणच लागतो! हा अटळ विरोधाभास आहे!
जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात!
वेडे आणि लहान मुले!
ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या!
जगण्याचा आनंद घ्या!
तुम्ही स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन रडू शकत नाही
आणि
स्वत:च स्वत:ला आनंदाने मिठी मारू शकत नाही!
आयुष्य म्हणजे दुसऱ्या साठी जगायची बाब आहे!
जे तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करतात त्यांना साथ द्या आणि त्यांची सोबत घ्या!
नाती पैशाच्या भाषेत अचूक व्यक्त करता येत नाहीत! कारण यातली गुंतवणूक तुम्हाला आर्थिक फायदा नाही देणार, मात्र तुम्हाला कायमची श्रीमंत करून जाईल!

06/07/2015

ाणसाला चमकायचंच असेल तर
त्याला स्वतःचाच प्रकाश
आणि
झळकायचे असेल तर
स्वतःचेच तेज
निर्माण करता आले पाहिजे...
झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानन्तरही घाबरत
नाही...
कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वत:च्या पन्खावर
विश्वास असतो....

18/04/2015

हल्ली आनंदी आणि समाधानी माणसं
दुर्मिळ झाली आहेत...
कोणाशी जरा बोलायला जा,
तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा
‘माझ्याकडे वेळ नाही,
माझ्याकडे पैसे नाहीत,
स्पर्धेत टिकाव कसा लागेल,
आज पाऊस पडतोय,
माझा मूड नाही !’....
आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या
सबबी आहेत...
काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद
मिळणार आहे...
पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय
Isn't it strange ?
मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा
वेळ लागतो ?
सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे
पडतात ?
आंघोळ करताना गाणं म्हणताय,
कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा
करायला ?
पाऊस पडतोय ?
सोप्पं आहे - भिजायला जा !
अगदी काहीही न करता गादीत लोळत
राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ?
माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या
हाताच्या मुठी बंद असतात....
परमेश्वराने एका हातात
'आनंद'
आणि एका हातात
'समाधान'
कोंबून पाठवलेलं असतं....
माणूस मोठा होऊ लागतो,
वाढत्या वयाबरोबर
'आनंद' आणि 'समाधान'
कुठे-कुठे सांडत जातात....
आता 'आनंदी' होण्यासाठी
‘कोणावर’ तरी,
‘कशावर’ तरी
अवलंबून राहावं लागतं....
कुणाच्या येण्यावर...
कुणाच्या जाण्यावर...
कुणाच्या असण्यावर...
कुणाच्या नसण्यावर...
काहीतरी मिळाल्यावर...
कोणीतरी गमावल्यावर...
कुणाच्या बोलण्यावर...
कुणाच्या न बोलण्यावर...
खरं तर,
'आत' आनंदाचा न आटणारा झरा
वाहतोय....
कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त
डुंबावं...
इतकं असून...
आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे
आहोत,
पाण्याच्या टँकरची वाट बघत...
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान
भागणं अशक्य !....
इतरांशी तुलना करत
आणखी पैसे,
आणखी कपडे,
आणखी मोठं घर,
आणखी वरची 'पोजिशन',
आणखी टक्के.. !
या 'आणखी' च्या मागे
धावता धावता त्या
आनंदाच्या झऱ्यापासून
किती लांब आलो आपण !....

18/04/2015

Hi...

27/06/2013

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saideep posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category