Goa Updates

Goa Updates Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Goa Updates, Latehar.

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तान...
06/06/2025

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्य़ाच्या इतिहासाची ही सफर..
बंदरापलीकडील रेवसहून अखेरची बोट सातवाजता भाऊच्या धक्क्य़ाला लागली आणि दिवसभर गजबजलेला तो कोकणी माणसाचा सखा- भाऊचा धक्का सुस्तावला.
गेली दीडशे वर्षे अव्याहतपणे मुंबईत कोकण्यांची आणि गोवेकरांची सेवा करणाऱ्या या धक्क्य़ाच्या प्रत्येक चिऱ्याला मग वाचा फुटली.
कारण अलिबागहून आलेल्या एका नवश्रीमंत फार्महाऊसवाल्याने ‘ये कौन भाऊ है जी?’..

टर्मिनस को जिसका नाम दिया है वो?’ असे कुत्सित उद्गार काढले. गेली दीड शतके या धक्क्य़ावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असत.
त्यांना हा प्रश्न कधी पडला नाही. उलटअभिमान असा की, ‘भाऊ’ हे घरगुती बिरुद जलवाहतुकीच्या टर्मिनसला दिले आहे आणि ते अनेक बेस्ट बसेसवर मराठीत झळकत आहे! कारण याचा जन्मदाता भाऊ अजिंक्य हा पक्का मुंबईकर! पाठारे प्रभू या मुंबईच्या आद्य रहिवाशांपैकी एक बांधकाम कंत्राटदार.
स्वधन मुंबईच्या हितासाठी खर्चिणारा.
ब्रिटिश राजवटीत कुलाब्याच्या गन फॅक्टरीत हा भाऊ कारकून होता. कॅप्टन रसेल हा तोफखाना विभागातील नामांकित अधिकारी.
त्याच्या विभागात एकदा एका मराठी माणसाने चोरी केली. त्याला लष्करी शिस्तीनुसार फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. एका गरीब मराठी तरुणाला सर्वासमक्ष फटके मिळूनत्याची बदनामी होणार, त्यामुळे लक्ष्मण अजिंक्य अस्वस्थ झाला.
त्याने रसेलसाहेबाकडे कामगाराच्या वतीने क्षमायाचना केली.
स्वत: देशाभिमानी असलेल्या कॅ. रसेलला, स्वदेशाचा विचार करून एका कामगाराचे फटके वाचविणाऱ्या हेडक्लार्क अजिंक्य या क्षुल्लक कामगाराविषयी आदर निर्माण झाला.
कॅ . रसेलने लक्ष्मणला मिठी मारून ‘यू आर माय ब्रदर!’ असे उद्गार काढून त्याची पाठ थोपटली.
या उद्गारांमुळे लक्ष्मण अजिंक्यला ‘भाऊ’ हे नाव पडले ते कायमचे!
कॅ. रसेलने या भाऊला व्यापारीक्षेत्रात शिरण्यास उद्युक्त केले.
मुंबईत असलेली डबकी आणि सांडपाणी तलाव, मुंबईच्याच कचऱ्याने बुजविण्याचे काम त्या काळी सुरू झालेहोते. भाऊला हे कंत्राट मिळाले. कॅ. रसेलसंबंधी कृतज्ञता म्हणून त्याने आपल्या कंपनीचे नाव ‘भाऊ रसेल आणि कंपनी’ असे दिले.
मुंबईच्या पूर्वकिनाऱ्यावर भरणी घालून कारनॅक बंदर आणि क्लेअर बंदर उभारणीचे कामहीही कंपनी करीत होती.
तेव्हा आपल्या मराठी माणसांचा जलप्रवास सुखकर व्हावा, यासाठी एक धक्का असावा, असा विचार भाऊ अजिंक्यच्या मनात बळावला. ईस्ट इंडिया कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट यांची अनुमती मिळवून त्याने तो स्वखर्चाने अमलात आणला.
कोकणच्

Congratulations
10/03/2025

Congratulations

॥महालसा नारायणी मंदिर॥म्हारदोळ,गोवा
10/03/2025

॥महालसा नारायणी मंदिर॥
म्हारदोळ,गोवा

*|| गोव्यातील देवकीकृष्ण मंदिर ||**हे भारतातील एकमेव श्रीकृष्ण मंदिर आहे जेथे भगवान श्रीकृष्ण आपल्या जन्मदाती - माता देव...
07/09/2023

*|| गोव्यातील देवकीकृष्ण मंदिर ||*

*हे भारतातील एकमेव श्रीकृष्ण मंदिर आहे जेथे भगवान श्रीकृष्ण आपल्या जन्मदाती - माता देवकी सोबत पुजला जातो म्हणून या मंदिराला 'देवकीकृष्ण' मंदिर म्हणतात.*

*या मंदिराच्या गाभाऱ्यात देवकी माता आपल्या लाडक्या मुलाला म्हणजे बाळकृष्णाला डाव्या कडेवर घेऊन प्रसन्न मुद्रेने उभी आहे.*

*परंतु भारतात नव्हे तर संपूर्ण जगात ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आहेत, त्या- त्या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान श्रीकृष्ण एकटेच उभे असल्याचे आपण पाहतो.*

*गोव्यातील या मंदिरात मात्र श्रीकृष्णाची जन्मदाती आई देवकीला भगवान श्रीकृष्ण पेक्षाही फारच महत्त्व देण्यात आले आहे. हे क्वचितच आपल्याला इतरत्र पहावयास मिळते.*

*हे मंदिर सध्या माशेल या गावात असून ते गोव्याची राजधानी पणजी पासून 21 की.मी. अंतरावर वसलेले आहे.*

*परंतु इ.स. 1530 पर्यंत म्हणजे गोवा प्रांतावर पोर्तुगीजांचे आक्रमण होण्या पूर्वी हे मंदिर माशेल पासून जवळ आलेल्या चोडन या बेटावर होते. जेव्हा बेटावरील जेष्ठ नागरीकांना सुगावा लागला की पोर्तुगीज या बेटावरील देवालय उध्वस्त करून त्याजागी चर्च बांधणार आहेत आणि हिंदू धर्मियांचे ख्रिस्तीकरण करणार आहेत. त्यावेळी त्यांनी तेथील सगळ्या देवालयातील मुर्तींसह बेटातून पलायन केले आणि फोंडा तालुक्यातील माशेल येथील एका वाड्यावर आले. त्यावेळी माशेल हा गाव विजापूर आदिलशाहीच्या ताब्यात होते. माशेल हे गाव मुसलमान राजाच्या ताब्यात असले तरी माशेलचा प्रत्यक्ष कारभार सरदेसाई नावाचा स्थानिक अधिकारी पाहत होता. त्यांनी सर्व मुर्ती आपल्या बंगल्यावर लपवून सुरक्षित ठेवल्या.*

*श्री देवकीकृष्णाचे सध्याचे भव्य दिव्य आकर्षक मंदिर इ.स.1832 साली बांधून श्री देवकीकृष्णाची प्रतिष्ठापना केली असे मंदिरात असलेल्या शिलालेखावरून स्पष्ठ होते. सध्या माता देवकीची मुर्ती हिरे, सोने चांदीच्या दागिन्याने मढविलेली आहे. तिचे दर्शन घेतल्यास मन प्रसन्न वाटते.*

गोव्यातील प्रसिद्ध इतिहासकार अनंत धुमे म्हणतात की पोर्तुगीजांनी गोवा प्रांतावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर वास्को-द- गामा यांची व्हाईसरॉय म्हणून नेमणूक झाली. एकदा त्यांनी आपल्या अधिकाऱ्यां सोबत चोडन बेटाला भेट दिली. भेटीच्या दरम्यान फेरफटका मारताना त्यांना श्री देवकी कृष्णाचे मंदिर दिसले आणि त्यांना मुख्य प्रवेशद्वारातून गाभाऱ्यातील देवकी कृष्णची मुर्ती त्यांना हुबेहूब मदर मेरी आपल्या डाव्या कडेवर इंफॅन्ट (बाळ) येशू ख्रिस्त ला घेऊन उभी आहे. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्वरीत देवीला सॅल्यूट केला आणि नंतर दोन्हीं गुडघे टेकून देवीला नमस्कार केला. हा प्रकार पाहून चकित झालेले पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी नंतर वास्को- द- गामा यांना सांगितले की देवळा तील ती मूर्ती 'मदर मेरी'ची नसून ती श्री देवकीकृष्णाची मूर्ती आहे. त्यावेळी वास्को-द-गामा यांना आपण हिंदू दैवते समोर नतमस्तक झालो याचा राग आला.*

*महाभारतात उल्लेख केल्या प्रमाणे माता देवकीचा आठवा पुत्र मथुरेचा राजा कंस चा वध करेल. या भविष्य वाणीने भयभीत झालेल्या कंसाने आपली बहीण देवकी आणि तिचे पती वासुदेव यांना आपल्या नजर कैदेत ठेवले होते. जेव्हा देवकीला आठवा पुत्र जन्मला आला तेव्हा तिने आपला पुत्र श्रीकृष्ण गोकुळातील माता यशोदाच्या स्वाधीन केले आणि त्याचवेळी माता यशोदाच्या पोटी जन्माला आलेली कन्या देवकीने आपल्या ताब्यात घेतली. येथे गोकुळात माता यशोदाने श्रीकृष्णाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढविले.*

*या घटनेला खूप वर्ष झाली. गोमाचाल पर्वतावर झालेल्या एका युद्धा नंतर जेव्हा श्रीकृष्णला आपली जन्मदाती माता देवकी हिची भेट झाली, तेव्हा तिने आपल्या पुत्राला ओळखलच नाही.*

*म्हणतात ना " भगवान तेरी लीला अपरमपार" - या प्रमाणे श्रीकृष्णाने माता देवकीच्या पोटी नुकतेच जन्माला आलेल्या बाळाचे रूप धारण केले. देवकीने त्वरित आपल्या बाळाला ओळखले आणि पाणावलेल्या डोळ्याने अत्यंत आनंदित होऊन धावत जाऊन आपल्या बाळाला कडेवर घेतले. तीच ही मूर्ती माशेल येथील देवळात आहे.*

*देवकी कृष्ण ही गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय श्री. मनोहर पर्रीकर यांची कुलदेवता आहे.

प्रचिती आणि परिक्रमेची एकत्रित अनुभूती…!कोकणात चित्रीकरण होत असलेल्या ‘क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा’ या मालिकेतील एका प्रसं...
26/07/2023

प्रचिती आणि परिक्रमेची एकत्रित अनुभूती…!

कोकणात चित्रीकरण होत असलेल्या ‘क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा’ या मालिकेतील एका प्रसंगासाठी मालिकेची टीम एका दिवसासाठी सावंतवाडी येथील वेत्ते गावी गेली होती. चित्रीकरणादरम्यान श्री देव वेतोबाच्या मूळ वेशातील रूप चित्रित करून संपूर्ण युनिट पुन्हा कोकणात मूळ सेटवर परतले. तेव्हा सर्व सामान जागच्याजागी ठेवत असताना वेतोबाची काठी सापडत नसून रात्रीचा अंधार, आऊटडोर शूट आणि कोकणातील पाऊसमुळे, काठी वेत्ते गावीच राहिल्याचे काही प्रोडक्शन वाल्यांच्या लक्षात आले. खूप पाऊस असल्याकारणास्तव दुसऱ्या दिवशी नेहमीच्या जागी चित्रीकरण सुरू करण्याआधी त्यांनी वेत्ते गाव गाठले. तेथे पोहोचताच ते अचंबित झाले. तीच काठी.. त्याच जागी…जशीच्या तशी… परंतू पूजलेली. गावकऱ्यांनी वेतोबा महाराजांची काठी…वेतोबा महाराज इथे येऊन गेले… या श्रद्धेने मनोभावे आत्मीयता वर्तवली. गावकऱ्यांचे इतके प्रेम, श्रद्धा, मालिके वरील आणि निर्मात्यांवरील विश्वास आणि आशीर्वाद पाहता क्षेत्रपाल श्री देव वेतोबानेच त्याची परिक्रमाही पूर्ण करून घेतल्याचा भास होतो.

ाठी #सोहळानात्यांचा

Address

Latehar
403516

Telephone

9702312348

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Goa Updates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share