10/03/2026
विषय : रोजगार मेळावा आयोजनाबाबत…
महोदय/महोदया,
स.न.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विभागीय केंद्र, कोल्हापूर, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 13 मार्च, 2026 यादिवशी विवेकानंद महाविद्यालयात, कोल्हापूर याठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
इयत्ता 10वी, 12वी उत्तीर्ण, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी आणि व्यावसायिक पदवीधारक विद्यार्थ्यांना आणि इतर विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या वरीलप्रमाणे पात्र विद्यार्थी व बेरोजगार युवकांना या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी लाभलेली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी आपल्याशी संबंधित विद्यार्थ्यांच्या वॉटस्-अँप ग्रुपवर माहिती प्रसारित करावी अशी विनंती आहे.
Registration Link- https://forms.gle/U77MWgbTPnuwdHbX9