15/12/2021
#वस्तू_हरवतात_वास्तू_नाही 🙏🚩
पिढीजात चालत आलेल्या शेतावरचा दगड इंचभर इकडे का तिकडे हलला नाही की हरवला नाही मग
ज्याच्या मुळे ह्या देशाच्या सीमा अबाधित राहिल्या अश्या महान राज्यकर्त्यांची समाधी हरवते हे खरंच पटण्या सारख आहे का ??
नाही म्हणजे समाधी कोणी शोधली किंवा पहिली शिवजयंती कोणी साजरी केली ह्या वादात मला अडकायचंच नाहीय 🙏🚩💯
पण पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज ह्याची समाधी खरंच हरवली होती का ??
हरवली होती तर कोणी शोधली त्याचे समकालीन पुरावे इतिहासात का सापडत नाहीत ?? 🤔 आणि शोधण्या इतकी ती खरच दुर्गम ठिकाणी होती काय असे बरेच प्रश्न आहेत 🙏🚩
आता हे बघा
सध्या जगदीश्वराच्या मंदिराला आत मध्ये जायला असणारी वाट पुर्ववत असली तरी कधी हा विचार केलाय का मंदिराला जायला असणारी वाट देवाळाच्या मागून कशी काय ??
जिथं देवळाचं मुख्य दार असत तिथूनचं मंदिर मध्ये जायला प्रवेशद्वार असतं मग ज्या मंदिराच्या समोरच ही समाधी आहे ती हरवण्याचा प्रश्न येईल का ??
आणि एवढी प्रशस्त इमारत जगदीश्वराची 🚩 त्याच्या बाजूला दगडी बांधकाम ची तटबंदी आणि त्याच्या समोरून आत मध्ये प्रवेश असणारी वाट आणि समोरच असणारी ही समाधी हरवण्या सारखी तरी जागा आहे का ओ ??
मग ती समाधी शोधून काढली हा वाद निर्माण कसा झाला 🤔🙄
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्याचा इतिहास म्हंटला की कायमच काहीतरी वाद का निर्माण होतो ह्याचा जरूर विचार व्हावा 🙏🙏 बाकी इतिहासाची पाने चाळताना काही संदर्भ सापडलेत ते कमेंट मध्ये मेन्शन करतो आहे
जर ह्या गोष्टी मध्ये महाराजांच्या समाधीचा उल्लेख आढळतो त्या अर्थी समाधी हरवली न्हवती हे सिद्ध होऊ शकतं 🙏🚩
बाकी तरीही कोणाला काही वाटत असेल तर आपल्याकडे त्याची ही उत्तरे भेटतील फक्त त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी एवढंच म्हणणं 🙏🚩💯
संदर्भ माहिती संकलन :- मानसिंग कदम 🚩
माहिती साभार :- तुषार यादव 🚩